देशात सलग तिसर्‍या दिवशी आढळले कोरोनाचे तीन लाखहून अधिक रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. सलग तिसर्‍या दिवशी तीन लाखहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर दोन हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 3 लाख 32 हजार 730 रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा 1 कोटी 62 लाख 63 हजार वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात 2 हजार 263 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1 लाख 86 हजार 920 वर पोहोचला आहे. सध्या देशात 24 लाख 28 हजार 616 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.