
मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण मोहिमेनंतर मुंबादेवी विधानसभेतील 95 हजार 832 मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याची तक्रार काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते आमदार अमिन पटेल यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
मुंबादेवीतील हजारो मतदारांना अनुपस्थित, स्थलांतरित, दुबार नावे, मृत्यू अशा विविध कारणात्सव मतदारांची नावे वगळण्यात आले आहे. याकडे अमिन पटेल यांनी मुख्य निवडणूक अधिकारी ए. चोक्कलिंगम यांचे लक्ष वेधत नावाची पुनर्नोंदणी व नवीन नोंदणीसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑक्टोबरपर्यंत वाढवावी तसेच सुनावणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.
























































