महाराष्ट्रात 96 हजार व्हीव्हीपॅट यंत्र वापरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

लोकसभा निवडणुकीसाठी या वर्षी प्रथमच व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार असून महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांसाठी 96 हजार व्हीव्हीपॅट यंत्र वापरली जाणार आहेत. यासाठी मतदान केंद्रांकर काम करणाऱया सहा लाख कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

व्हीव्हीपॅट यंत्रणा ‘ईव्हीएम’ मशीनसाठी पूरक असून मतदान केल्याची पावती या यंत्रांच्या माध्यमातून मतदारास मिळणार आहे. मतदाराने ज्या उमेदवाराला मत दिले त्यासंदर्भात माहिती व्हीव्हीपॅट मशीनवरील बटन दाबल्यानंतर मिळू शकेल. मतदान केंद्रांमध्ये हे व्हीव्हीपॅट यंत्र बसविण्यात येणार आहे. मतदान केल्यानंतर 7 सेकंदांमध्ये मतदाराला पावती मिळणार असून त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल.

या पावतीमुळे मतदाराला त्याने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य होईल. महाराष्ट्रासाठी सुमारे 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करून देण्यात येतील. त्यापैकी प्रत्येक मतदान केंद्रावर एक याप्रमाणे 96 हजार यंत्रांचा वापर या निवडणुकीत केला जाणार आहे. तर अतिरिक्त व्हीव्हीपॅट यंत्र झोनल अधिकाऱयांच्या ताब्यात देण्यात येईल.