Mumbai Local Train News – कांजूरमार्ग–भांडुपदरम्यान लोकल ट्रेनची वाहतूक ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईसह उपनगर आणि ठाण्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका लोकल ट्रेनच्या वाहतुकीला बसला आहे. कांजूरमार्ग आणि भांडुप स्थानकांदरम्यान स्लो लाईनवरील लोकल सेवा सध्या थांबवण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे ट्रॅकवर पाणी साचल्याने आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रेल्वे प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पाणी ओसरल्यानंतर सेवा पूर्ववत सुरू करण्यात येई, असे सांगण्यात आले आहे.