
मुंबईतील पहिल्याच पावसात आज महापौर रितू तावडे पाणी तुंबलेल्या ठिकाणांची पाहणी करीत असताना एक पालिका अधिकारी महापौरांच्या डोळ्यांदेखत मॅनहोलमध्ये कोसळला. गांधी मार्केट येथे ही घटना घडली. यामुळे नालेसफाई, मॅनहोल सुरक्षा अशी पावसाळापूर्व कामे 100 टक्के झाल्याच्या दाव्याची पोलखोल झाली.





























































