
सामना ऑनलाईन । मुंबई
केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी माझ्या राजीनाम्याची मागणी करण्याऐवजी त्यांनी कुपोषण आणि बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्याकडे लक्ष द्यावे, असा खोचक सल्ला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनेका गांधी यांना दिला आहे. अवनी वाघिणीच्या हत्येप्रकरणी मनेका गांधी यांनी रविवारी ट्विटरवरून मुनगंटीवारांवर हल्ला चढवला होता. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मुनगंटीवार यांना पदावरून हटवावे अशी मागणी केली आहे. त्यानंतर मुनगंटीवार यांनी प्रथमच मनेका गांधी यांच्यावर पलटवार करत त्यांना खोचक सल्ला दिला आहे.
She (Maneka Gandhi) should work against malnutrition and child deaths, rather than seeking someone’s resignation. I also think tigers are important but I feel human life is equally important.Don’t know what she doesn’t understand: S Mungantiwar, State Forest Minister #TigressAvni pic.twitter.com/hznAiC9Zaf
— ANI (@ANI) November 6, 2018
मनेका या वन्यजीवप्रेमी आहेत. त्यांच्या भावना आम्ही समजू शकतो. वाघिणीचा जीव महत्वाचा आहे. देशातील वाघांचे महत्त्वही मला माहित आहे. वाघिणीला वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र, वाघिणीच्या जीवाइतकाच सामान्य नागरिकांचांही जीव महत्त्वाचा आहे, हे गांधी यांना कसे समजत नाही असा सवालही त्यांनी केला. त्यांनी राज्याच्या खात्यांकडे लक्ष देण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या खात्याकडे लक्ष देऊन कुपोषण आणि बालमृत्यूंची समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे असे त्यांनी म्हटले आहे.
मुनगुंटीवारांचे मंत्रीपद काढून घ्या, मनेका गांधींची नवी मागणी
या प्रकरणात मी दोषी असेल तर मुख्यमंत्री माझ्य़ावर कारवाई करतील. मला पदावरून हटवण्याचा निर्णय आणि अधिकार त्यांना आहे. मात्र, याबाबत निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार मनेका गांधी यांना नाही, असेही मुनगंटीवार यांनी गांधी यांना सुनावले आहे.
























































