
संजय दत्तच्या चित्रपटांची यादी मुन्नाभाईखेरीज पूर्ण होऊ शकत नाही. मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटांनी संजय दत्तची प्रत्यक्षातील प्रतिमाही बऱ्याच अंशी बदलली.. सकारात्मक केली. आता आजच्या लोकशाहीच्या महोत्सवाची खास भेट संजू बाबा आणि अर्शद वारसीने आपल्या प्रेक्षकांसाठी आणली आहे.
मुन्नाभाईची ही लोकप्रिय जोडी अर्थात सर्किट आणि मुन्नाभाई पुन्हा प्रेक्षकांना हसवायला रुपेरी पडद्यावर येत आहे. ही संजय दत्तची निर्मिती असेल. या विनोदी चित्रपटाचे नाव अजून ठरलेले नाही. संजय दत्तने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करून ही बातमी दिली आहे. तो लिहितो.. तुमची आणि आमचीसुद्धा दीर्घकालीन प्रतीक्षा आता संपली आहे.. फायनली मी आणि अर्शद पुन्हा तुम्हाला हसवायला येतो आहोत..
मुन्नाभाईची ही जोडी तीच असली तरी यावेळी दिग्दर्शकाच्या खुर्चीवर राजकुमार हिरानी नसून सिद्धांत सचदेव बसलेला आहे. अर्शद वारसीही या आपल्या नव्या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुक आणि अधीर आहे. नेटकरयांकडूनही या पोस्टला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. सगळ्यांच उत्सुकता आहे की हा मुन्नाभाई ३ असावा. एकाने लिहिले आहे.. क्या यह मुन्नाभाई सिरीज नही है? ऐसा मत करो भाई..






























































