मंदिरात पाणी पिण्यास गेलेल्या मारहाण झालेल्या मुलाला 10 लाख रुपयांची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशमध्ये एक मुस्लिम अल्पवयीन मुलगा पाणी पिण्यासाठी मंदिरात गेला होता. तेव्हा मंदिरातील काही तरुणांनी या मुलाला मारहाण केली होती. या मुलासाठी 10 लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे.

आल्ट न्युजच्या एका सहसंस्थापकाने पीडित मुलासाठी निधी गोळा करण्याची मोहीम हाती घेतली होती. केट्टो या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा निधी गोळा करण्यात आला. आतापर्यंत 648 जणांनी अवघ्या दोन दिवसात 10 लाख रुपयांची मदत जमा केली आहे.

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एका मंदिरात एक मुस्लिम अल्पवयीन मुलगा पाणी पिण्यासाठी गेला होता. तेव्हा मंदिरातील शृंगी नंदन यादव या तरुणाने या मुस्लिम मुलाला मारहाण केली. इतकेच नाही तर त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरलही केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. या घटनेमुळे देशात मोठा वाद निर्माण झाला होता.