
सामना प्रतिनिधी। नगर
नगरमधील बुरानगर देवीच्या मुखड्याची चोरी झाल्यानंतर शहरांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी आता एका संशयित आरोपीचा स्केच जारी केला असून याबद्दल कुणास काही माहिती असल्यास कळवावे असे आवाहन केले आहे.
काही दिवसांपूर्वी या मुखवट्याची चोरी झाली होती. सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला दिले होते. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात एका संशयिताबद्दल माहिती मिळाली. त्यावरून हे स्केच तयार करण्यात आले आहे.
































































