स्थगिती नाकारत नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या निवडणुकीची अंतिम उमेदवारी यादी जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या निवडणुकीदरम्यान राज्य संघाच्या कार्यकारिणीतील विशेष समितीने निवडणुकीला दिलेली स्थगिती नाकारत निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड.जी.डी. देशमुख, अ‍ॅड.एस.जी.सोनारीकर आणि अ‍ॅड.राजेश नाईक यांनी आज अंतिम उमेदवारी यादी जाहीर केली आहे.

नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाची निवडणूक प्रक्रिया सुरु असून, दि.२७ डिसेंबर ही विविध पदासाठी अर्ज भरता यावा म्हणून शेवटची तारीख होती. त्याच दिवशी राज्य संघाच्या बार असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा च्या विशेष समितीचे सदस्य अ‍ॅड.श्यामसुंदर लांगट यांनी या निवडणुकीला स्थगिती दिल्याचे आदेश केले होते. पण आज अभिवक्ता संघाच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांची छाननी करुन अंतिम उमेदवारी यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी प्रसिध्द केली आहे. त्यांना यासंदर्भाने स्थगिती आली काय याची विचारणा केली तेंव्हा बार असोसिएशनला स्थगिती देण्याचे अधिकारच नाहीत उलट स्थगिती देणाऱ्या विशेष समितीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याचे सांगितले. सोबत या निवडणुकीला स्थगिती करण्याचे अधिकार फक्त धर्मादाय उपायुक्त किंवा उच्च न्यायालय यांनाच असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड.जी.डी.देशमुख यांनी सांगितले.

उमेदवाराच्या अंतिम यादीमध्ये अध्यक्ष पदासाठी माजी अध्यक्ष अ‍ॅड. मिलिंद अरविंदराव एकताटे यांच्यासह अ‍ॅड.मिलिंद मधुकरराव लाटकर आणि अ‍ॅड.पंडित नामदेवराव शिंदे यांनी अर्ज भरले आहेत. उपाध्यक्ष पदासाठी माजी उपाध्यक्ष जगजीवनराव तुकाराम भेदे यांच्यासह अ‍ॅड.गजानन रामकृष्ण पिंपरखेडे, अ‍ॅड.पुनीत ग्यानोजी हानवते आणि अ‍ॅड.राजाराम कोंडबाराव वीर यांनी अर्ज भरले आहेत. सचिव पदासाठी अ‍ॅड.गजानन रामकृष्ण पिंपरखेडे, अ‍ॅड. संजय राजेश्वर मलदोडे, अ‍ॅड.माणिक बाबूराव वाखरडे यांच्यासह माजी सचिव अ‍ॅड.नितीन लक्ष्मणराव कागणे यांनी अर्ज भरले आहेत. सहसचिव या पदासाठी अ‍ॅड.अब्दुल नदीम खान अब्दुल गफूर खान आणि अ‍ॅड.श्यामसुंदर शंकरराव वाकोडे यांनी अर्ज भरले आहेत. कोषाध्यक्ष या पदासाठी अ‍ॅड.माणिक बापूराव वारखडे आणि अ‍ॅड.चंद्रकांत यलप्पा मेटकर यांनी अर्ज भरले आहेत. विशिष्ट सहायक या पदासाठी अ‍ॅड.चंद्रकांत यलप्पा मेटकर आणि अ‍ॅड.दिलीप माधवराव गंगातीर यांनी अर्ज भरले आहेत.

अभिवक्ता संघाच्या कार्यकारिणीमध्ये बारा सदस्य असतात. या बारा सदस्यांसाठी बाराच वकीलांनी अर्ज भरल्याने सदस्य पदाच्या बारा पदांची निवडणूक बिनविरोध झाल्याचे मानले जाते. सदस्य पदासाठी अर्ज भरणारे अ‍ॅड.सुभाष मुंजाजी बेंडे, अ‍ॅड.रणजितसिंघ भगिरथसिंह बैस, अ‍ॅड.प्रसाद नामदेव राणवळकर, अ‍ॅड.अखमलोद्दीन महंमद गियासोद्दीन, अ‍ॅड.संग्राम देवराव गायकवाड, अ‍ॅड.प्रदीप उत्तमराव शिंदे, अ‍ॅड.मंगल शिवराज पाटील, अ‍ॅड.विलास महाजनराव पवार, अ‍ॅड.लता निवृत्ती नवघडे, अ‍ॅड.शेख अब्दुल हक अब्दुल करीम, अ‍ॅड.शेख शकील महंमद इब्राहीम, अ‍ॅड.अंबादासराव रामराव बडगे यांचा समावेश आहे.