आनंदीबाई जोशींना अभिवादन करताना नारायण राणेंनी शेअर केला अभिनेत्रीचा फोटो, नेटकऱ्यांनी फटकारले

देशाच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या स्मृतीदिनानिमित्त केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे सध्या त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. तसेच त्यांच्या अज्ञानावरून नेटकरी त्यांचा चांगलाच समाचार घेत आहेत.

नारायण राणे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जागी चित्रपटात त्यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद हिचा फोटो लावला आहे. पोस्टमध्ये भाग्यश्री मिलिंद हिचा चित्रपटातील एक पोट्रेट मोठ्या साईजमध्ये लावला असून आनंदीबाई जोशी यांचा खरा फोटो मागे ब्लरमध्ये लावला आहे. या पोस्टवरून नेटकरी सध्या नारायण राणे यांच्यावर टीका करत आहेत.

आनंदीबाई जोशी या हिंदुस्थानातील पहिल्या महिला डॉक्टर असून त्या मूळच्या महाराष्ट्रातील आहेत. लहान वयातच आनंदीबाईंचे लग्न त्यांच्याहून 20 वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्यासोबत झाला. आनंदीबाई जोशी यांनी अमेरिकेतील विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया या कॉलेजमधूनव डॉक्टरकीचे शिक्षण घेतले.