“सरकारच्या विरोधात ठामपणे उभे राहणाऱ्यांविरुद्ध सरकारी यंत्रणांचा गैरवापर” जयंत पाटलांचं टीकास्त्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी आज पहाटे पुन्हा ईडीने छापा टाकला. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली असून आता यासंदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, ”हसन मुश्रीफ यांच्या घरावर याअगोदरही आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. मात्र त्यामध्ये काहीच सापडले नाही. आता त्यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. सरकारच्या विरोधात जे ठामपणे उभे राहतात आणि सरकारला विरोध करतात त्यांच्याविरोधात सर्व यंत्रणांचा गैरवापर करून त्यांना बदनाम व नामोहरम करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.