
>> विजयकुमार राजापुरे
चादर व टॉवेल उत्पादनासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या सोलापूरच्या टेक्स्टाइल उद्योगाने नवा प्रयोग करीत फॅशनच्या दुनियेत नवा ट्रेंड निर्माण केला असून, चादरीपासून चक्क आकर्षक जॅकेट्स बनविली आहेत. ही जॅकेट्स विक्रीसाठी बाहेर येण्याअगोदरच तरुणांत धूम मचावली आहे. आज लोणावळा येथे या जॅकेट्सचे लाँचिंग केले.
सोलापूर हे देशातील वस्त्र्ााsद्योगाचे महत्त्वाचे केंद्र आहे. कापडाबरोबरच चादर व टॉवेलसाठी जगभर प्रसिद्ध असणाऱया येथील टेक्स्टाइल उद्योगाने अनेक अडचणींवर मात करीत प्रयोगशील उत्पादने घेत जगात आपला नावलौकिक टिकवून ठेवला आहे. टेक्स्टाइल उद्योगात आता पारंपरिकतेबरोबरच आधुनिक व नावीन्यतेचा ध्यास घेतलेली पिढी समोर येत आहे. त्यामुळे आधुनिक उत्पादने घेण्यासाठी कल वाढला आहे. यापूर्वी नॉर्थ अमेरिकेमध्ये चादरीपासून बनविलेल्या सोलापूरच्या पिशव्या लक्ष वेधून घेतल्या होत्या. काही वर्षांपूर्वी चादर केवळ थंडीपासून बचावासाठी न वापरता त्यापासून फॅशनेबल वस्त्र्ा तयार करण्याचा ट्रेंड काहीच्या कल्पनेत आला आणि बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिचा पती जगप्रसिद्ध गायक निक जोन्स यांनी एक फॅशन शोमध्ये सोलापुरी चादरीपासून बनविलेले शर्ट परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा सोलापूरची चादर चर्चेत आली होती.
हीच संकल्पना समोर ठेवून सोलापुरातील नव्या पिढीतील उद्योजकांनी चादरीपासून चक्क जॅकेट बनविण्यात सुरुवात केली आहे. टेक्स्टाइल उद्योजक सत्यनारायण गुर्रम यांनी पहिल्यांदा ही संकल्पना मांडली व त्याचा यंत्रमाग उद्योजक चावीक बुर्गल यांनी सहकार्य करीत चादरीपासून जॅकेट्स बनविण्याचे काम सुरू केले. लोणावळा येथील कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ सोलापूर एमआयडीसीचे संचालक सपत्नीक ही जॅकेट्स परिधान करणार आहेत.
युवावर्गाला समोर ठेवून उत्पादन
वस्त्र्ााsद्योगात अनेक प्रयोग होत आहेत. कारखान्यात उत्पादित चादरीपासून यापूर्वी बॅग, शर्टसह अनेक उत्पादने घेतली आहेत. चादरीपासून जॅकेट्स ही संकल्पना युवावर्गाला समोर ठेवून तयार करण्यात आली आहे. सोलापुरात आंतरराष्ट्रीय वस्त्र्ााsद्योग परिषद भरविली असताना नवनवीन कल्पना पुढे आल्या. यातूनच जॅकेटची संकल्पना सुचली. सध्या याचे उत्पादन मर्यादित असून, 800 ते 900 यादरम्यान दर ठेवण्यात आले आहेत. येत्या मकरसंक्रांत व आगामी काळात मार्केटिंगसाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे टेक्स्टाइल उद्योजक सत्यनारायण गुर्रम यांनी सांगितले.




























































