सीरियात क्लोरीन हल्ला, नऊ जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अलेप्पो

सीरियामध्ये दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला आहे. शनिवारी अलेप्पो शहरात दहशतवाद्यांनी केलेल्या रासायनिक हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. क्लोरीन हल्ल्यामुळे नागरिकांना श्वास घ्याण्यास त्रास होत आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर सीरियाच्या सैन्यदलाकडून देखील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले सुरू केले आहेत.

अलेप्पोचे गव्हर्नर हुसेन दियाब यांनी जखमींची संख्या वाढत असल्याचे सांगितले आहे. क्लोरीनच्या विषबाधेमुळे आत्तापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला असून 55 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रसार माध्यमांकडून देण्यात आली आहे.

सीरियन सैनिकांनी 2016 मध्ये अलेप्पो शहराला दहशतवाद्यांच्या ताब्यातून मुक्त केले होते. मात्र पुन्हा अलेप्पोवर ताबा मिळवण्यासाठी दहशतवाद्यांकडून हल्ले सुरू असून, मोठ्या प्रमाणावर रासायनिक अस्त्रांचा वापर केला जात आहे.