स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे उद्यापासून ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग, एमपीएससी, आरबीआय, एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये नोकरभरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब (अराजपत्रीत), आरबीआय, एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये ज्युनिअर असिस्टंट या पदासाठी नोकरभरती होणार आहे. या नोकरभरतीत अधिकाधिक भूमिपुत्रांना यश मिळावे यासाठी शिवसेना प्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्फे नोकरभरतीपूर्व परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, महासंघ कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, महासंघ सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या सूचनेनुसार सदर नोकरभरतीपूर्व परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग महासंघातर्फे शनिवार 30 मेपासून सुरू करण्यात येत आहेत. प्रशिक्षण कालावधी 10 ते 12 दिवसांचा असेल. ज्या उमेदवारांनी नोकरभरतीसाठी वरील आस्थापनेत अर्ज केले असतील त्यांनी नाव नोंदणीसाठी शिवसेना भवन, पहिला मजला, लोकाधिकार समिती कार्यालय येथे शरद एक्के (9892699215), श्रीराम विश्वासराव (9869588469), विलास जाधव (9619118999) यांच्याशी संपर्क साधावा. या प्रशिक्षण वर्गाचा लाभ जास्तीत जास्त भूमिपुत्रांनी घ्यावा, असे आवाहन महासंघाचे संघटक सचिव व प्रशिक्षण वर्ग प्रमुख उमेश नाईक यांनी केले आहे.