पंढरपुरात भाजपला धक्का, कल्याणराव काळे राष्ट्रवादीच्या वाटेवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधानसभा पोटनिवडणुकीपूर्वीच पंढरपुरात भाजपला जोरदार धक्का बसणार आहे. कल्याणराव काळे यांनी पुन्हा घरवापसी करण्याचा अर्थात राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

पंढरपूर शहर आणि तालुक्यातील 22 गावांमध्ये कल्याणराव काळे यांच्या शब्दाला वजन आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपमध्ये गेले होते. मात्र आता भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांनी सर्व ताकद भगीरथ भालके यांच्या पाठीशी उभी करण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना फार्म हाऊसवर स्नेहभोजनासाठी बोलावून काळे यांनी एक पाऊल पुढे टाकल्याचे मानले जाते. काळे यांच्या या निर्णयामुळे पंढरपुरात एकसंध विठ्ठल परिवार विरुद्ध परिचारकांचा पांडुरंग परिवार अशी लढत रंगणार आहे.