Corona Virus – भाजपचे माजी आमदार पास्कल धनारेंचे कोरोनामुळे निधन

डहाणूचे माजी आमदार पास्कल धनारे यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाल्याने गुजरातच्या वापी येथील रेन्बो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांना दाद देत नसल्याने त्यांची प्रकृती खालवली होती. सोमवारी पहाटे 4.30 च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

धनारे यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत गेली होती. वापीतील रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारांना दाद न दिल्याने त्यांचे निधन झाले. भाजप वसई-विरार जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष मनोज बारोट यांनी धनारे यांचे निधन झाल्याचे वृत्त ट्विटद्वारे कळविले आहे.

डहाणू विधानसभा मतदारसंघात पास्कल धनारे यांच्या रुपात 2014 साली भाजपला पहिल्यांदा विजय मिळाला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या