निसांकाचा द्विशतकी झंझावात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीलंकन सलामीवीर पथुम निसांकाने शुक्रवारी धडाकेबाज द्विशतकी खेळी साकारली. निसांकाने 20 चौकार व 8 षटकारांसह 139 चेंडूंतच नाबाद 210 धावा फटकावल्या, श्रीलंकेसाठी एकदिवसीय प्रकारात द्विशतक झळकवणारा तो पहिला, तर विश्वातील एपंदर दहावा फलंदाज ठरला. या द्विशतकामुळे अफगाणिस्तानविरुद्ध श्रीलंकेने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 50 षटकांत 3 बाद 381 धावांचा डोंगर उभारला.

पालेकेले स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात 25 वर्षीय निसांकाने एकदिवसीय कारकीर्दीतील बरोबर 50व्या सामन्यात एपंदर चौथे शतक साकारले. श्रीलंकेसाठी लिस्ट ए क्रिकेटमध्ये द्विशतक झळकवणारा निसांका पाचवा फलंदाज ठरला. यापूर्वी चार महिला क्रिकेटपटूंनी श्रीलंकेसाठे द्विशतक साकारले होते. त्याने 136 चेंडूंतच द्विशतकाची वेस ओलांडली. अविष्का फर्नांडो (88) व सदीरा समरविक्रमा (45) यांनीही फटकेबाजी केल्याने श्रीलंकेला 350 पेक्षा अधिक धावसंख्या उभारता आली.