गतिमंद मुलीची हत्या करून आईची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पेण

गेल्या 15 वर्षांपासून बिछान्याला खिळून असलेल्या गतिमंद मुलीचे हाल पहावत नसल्याने तिची हत्या करून आईने गळफास घेतल्याची हृदयद्रावक घटना पेण येथे घडली. सविता डंगर आणि संस्कृती डंगर अशी या दुर्दैवी मायलेकींची नावे असून या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

शहरातील झिराड आळी येथे राहणाऱया सविता डंगर यांची मुलगी संस्कृती ही गतिमंद होती. तिचे रोजचे हाल पाहण्यापेक्षा आत्महत्या करण्याचा निर्णय सविताने घेतला. मात्र आपल्यानंतर लाडक्या लेकीचे काय होणार या चिंतेने आधी तिने संस्कृतीची गळफास देऊन हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेतला. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय धुमाळ हे करीत आहेत.