फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा, फ्लिस्कोवाला पराभवाचा धक्का

फ्रेंच ओपन टेनिस ग्रॅण्डस्लॅमधील धक्कादायक निकाल गुरुवारी लागला. 2017 साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकणाऱया येलेना ओस्तापेन्को हिने दुसरी सीडेड पॅरोलीना फ्लिस्कोवा हिला 6-4, 6-2 असे सरळ सेटमध्ये पराभूत करीत महिला एकेरीच्या पुढल्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीच्या अन्य लढतीत पेत्रा क्वितोवा हिने जास्मीन पाओलीनी हिला 6-3, 6-3 असे सहज हरवत पुढे पाऊल टाकले.

पाच सेटचा किंग
जर्मनीचा युवा टेनिसपटू अॅलेक्झॅण्डर झ्वेरेव हा पाच सेटचा किंग ठरतोय. बुधवारी मध्यरात्री संपलेल्या लढतीत या पठ्ठय़ाने फ्रान्सच्या पीअर हरबट याला 2-6, 6-4, 7-6, 4-6, 6-4 अशा फरकाने पाच सेटमध्ये हरवले आणि पुरुषांच्या एकेरीत आगेपूच केले. यावेळी पॅरिस येथे पाच सेटपर्यंत रंगलेल्या सहाही लढती त्याने जिंकल्या आहेत. तसेच मागील पाच सेटपर्यंत रंगलेल्या सातपैकी सहा लढतींमध्ये त्याला विजय मिळवता आला आहे. फक्त डॉमिनिक थीमविरुद्धच्या अमेरिकन ओपनच्या फायनल लढतीत तो पराभूत झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या