
केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेत तब्बल 14 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. सीबीआयने हा घोटाळा उघडकीस आणला आहे.
NDTV ने याबाबत वृत्त दिले आहे. DHFLया कंपनीचे मालक कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांनी हा घोटाळा केला आहे. दोघांनी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत आपल्या गुंतवणुकदारांकडून 88 हजार 651 खाती उघडली आणि त्यांच्या माध्यमातून 539 कोटी रुपये अनुदान आणि व्याज मिळाल्याचे सांगितले. तसेच गुंतवणुकदारांकडून 1 हजार 347 कोटी अनुदान येणे बाकी असल्याचे सांगितले.
पण जेव्हा कंपनीचे ऑडिट करण्यात आले तेव्हा वाधवान बंधुंनी एकूण अडीच लाख खोटी खाती बनवली होती. या खात्यातून वाधवान बंधुंनी आवास योजनेचे पैसे लाटले होते.
सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या शाखेत 2007 ते 2019 दरम्यान खाती उघडण्यात आली होती, त्यातून 14 हजार 46 कोटी रुपयांचे गृहकर्ज मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी 11 हजार 755 कोटी रुपये कर्ज हे खोट्या कंपनीतून घेतले होते. या घोटाळ्यात वाधवान बंधुंनी इतर घोटाळ्यातून जमा केलेली रक्कम वापरली.
सीबीआयने गेल्या वर्षी जून महिन्यात येस बँकेच्या घोटाळ्याप्रक्रणी वाधवान बंधूंविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात येस बँकेचे संस्थाकप राणा कपूर यांनाही सह आरोपी करण्यात आलेहोते. सीबीआयचा आरोप आहे की कपूर कुटुंबाने डीएचएफएल मध्ये 3 हजार 700 कोटी रुपये गंतवण्याच्या बदल्यात 600 कोटी रुपयांची लाच घेतली होती. याच घोटाळ्याच्या आरोपाखाली सीबीआयने राणा कपूर आणि वाधवान बंधुंना अटक केली होती.




























































