
सामना ऑनलाईन, मेक्सिको
मेक्सिको शहरामध्ये 38 वर्षांच्या पॉर्न स्टारचा मृत्यू झाला आहे. बिल बेली असं या व्यक्तीचे नाव असून तो दिवसभर दारू पित बसला होता असं हॉटेलमधल्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. ज्या हॉटेलमध्ये त्याने खोली भाड्याने घेतली होती त्याच हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला आहे. बिल हा मेक्सिकोमध्ये ‘काम’ प्रदर्शन 2019 साली आला होता.
We are incredibly saddened to hear about Bill Bailey’s passing. Bill was a respected and beloved figure in the adult community and he will be sorely missed. Our hearts go out to his family and friends – The Brazzers Team
— Brazzers (@Brazzers) March 4, 2019
Absolutely heartbroken. Would have done anything for anyone this man. One of my closest friends whom i loved dearly bless him. Wish i there to have looked after ya, wish this never happened don’t want to believe it mate. RIP Bill Bailey pic.twitter.com/BSFuWTHWXG
— Danny Mountain (@DannyMountain10) March 4, 2019
बिल हा त्याची प्रेयसी एजे अॅपलगेट ‘हॉटेल ग्रँड प्रिक्स’ हॉटेलमध्ये आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसभर दारू प्यायल्याने बिलला शुद्ध नव्हती. ज्या खोलीमध्ये तो उतरला होता त्या खोलीबाहेरच्या जिन्याच्या भागामध्ये बिलचा जिन्याच्या कठड्यावरून तोल गेला आणि तो खाली आदळला. थेट पार्किंगमध्ये जाऊन कोसळलेल्या बिलचा जागीच मृत्यू झाला.
Bill Bailey Dies in Accident While Attending Expo Sexo https://t.co/0N9DxCnheH pic.twitter.com/PmJuGeVb9E
— AVN Media Network (@AVNMediaNetwork) March 4, 2019
मेक्सिकोमधील अमेरिकेच्या दूतावासाशी तत्काळ संपर्क साधण्यात आला आणि त्यांना बिलच्या मृत्यूबाबात माहिती देण्यात आली. दूतावासाने बिलच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूबाबतची माहिती दिली असल्याचं सांगितलं आहे. दूतावासाने देखील या घटनेची चौकशी केली. चौकशीनंतर हा अपघात होता आणि बिलच्या मृत्यूमागे कोणताही घातपात नाहीये हे कळालं.




























































