
सामना प्रतिनिधी । हिंगाली
वसमत विधानसभा क्षेत्रात युवानेते प्रशांत गायकवाड यांची युवक काँग्रेसच्या पालघर जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशांत गायकवाड यांना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी नियुक्तीपत्र दिले आहे.
काँग्रेसचे गुजरात प्रभारी तथा हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांच्या मार्गदर्शनाखाली युवानेते प्रशांत गायकवाड यांनी वसमत विधानसभा क्षेत्रात युवकांचे संघटन करण्यासोबतच पक्षाच्या कामात सहभाग नोंदविला आहे. गायकवाड हे वसमत नगर पालिका निवडणुकीच्या थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविली होती. त्यांच्या संघटनात्मक कामाची दखल घेऊन युवक काँग्रेसचे पालघर जिल्हा प्रभारी म्हणुन नियुक्ती देण्यात आली आहे. तातडीने ही जबाबदारी स्वीकारुन पालघर जिल्ह्यात युवक काँग्रेसची संघटनात्मक बांधणी युवक काँग्रेसच्या विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय ठेवून करावे, अशी सुचना नियुक्तीपत्रात करण्यात आली आहे. या निवडीबद्दल प्रशांत गायकवाड यांचे खासदार राजीव सातव, आमदार संतोष टारफे, प्रदेश सचिव अ. हाफीज, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे आदींनी अभिनंदन केले आहे.

































































