केंद्रात महाआघाडीचा झेंडा फडकेल; तेज प्रताप यादव यांची भविष्यवाणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजद नेते आणि बिहार सरकारमधील मंत्री तेज प्रताप यादव त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. आताही त्यांनी मोठे विधान केले आहे. राजकीय वर्तुळात त्याची चर्चा होत आहे. आपण जी भविष्यवाणी करतो, ती सत्य होते, असा दावाही त्यांनी केला आहे. आता आपण भविष्यवाणी करत आहोत की, केंद्रात लवकरच महाआघाडीचा झेंडा फडकेल, असे ते म्हणाले. या आधी आपण नीतीश कुमार यांच्याबाबत भविष्यवाणी केली होती. ती सत्य झाली आहे. आता ते आमच्यासोबत आहेत.

बिहारच्या राजकारणात तेज प्रताप आपल्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. शनिवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी ही भविष्यवाणी केली आहे. भाजपबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, आम्ही काम करण्यावर लक्ष देतो. भाजप काय करत आहे, ते जनता बघत आहे. ते फक्त स्वतःच्या पक्षासाठीच सर्व करत आहेत. जनतेसाठी त्यांचे कोणतेच काम दिसत नसल्याची टीकाही त्यांनी केली. बिहारच्या जनतेने भाजपला नाकरले आहे. आपल्या आधीच्या भविष्यवाणी सत्य ठरल्या आहेत. आपली ही भविष्यवाणीही सत्य ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.