Prithvi Shaw पृथ्वी शॉ याच्या कारवर हल्ला, बेसबॉलच्या बॅटने काचा फोडल्या; धक्कादायक कारण आले समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ सध्या मैदानापासून लांब आहे. रणजी करंडकामध्ये दमदार कामगिरीनंतरही त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेसाठी संधी मिळालेली नाही. एकीकडे संघात स्थान मिळवण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू असतानाच दुसरीकडे त्याच्या कारवर मुंबईत हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे.

पृथ्वी शॉ याची कार समजून त्याच्या मित्राच्या कारवर हल्ला करण्यात आला आहे. पृथ्वी शॉ याने दुसऱ्यांदा सेल्फी घेण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आला. या प्रकर ओशिवरा पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हा हल्ला झाला तेव्हा पृथ्वी शॉ कारमध्ये नव्हता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वी शॉ सहारा स्टार हॉटेल येथे असताना आरोपी सना उर्फ सपना गिल आणि शोबित ठाकूर यांनी त्याच्याकडे सेल्फीसाठी हट्ट केला. दोघांनी सेल्फीही घेतला, मात्र पुन्हा एकदा सेल्फी घेण्यासाठी पृथ्वीला सोबत येण्यास सांगितले. परंतु पृथ्वीने नकार दिला आणि मित्रांसोबत जेवणासाठी निघून गेला. त्यानंतर हॉटेलच्या मॅनेजरने दोघांनाही बाहेर काढले. त्यामुळे दोन्ही आरोपी संतप्त झाले आणि त्यांनी काही वेळानंतर हॉटेलबाहेर पडलेल्या पृथ्वीच्या कारचा पाठलाग सुरू केला.

पृथ्वी शॉ याची कार जोगेश्वरी रोडवरील पेट्रोल पंपाजवळ आलेली असताना आरोपींनी समोरून कार अडवली. त्यानंतर बेसबॉलच्या बॅटने कारच्या काचा फोडल्या. सुदैवाने या कारमध्ये पृथ्वी शॉ नाही तर त्याचा मित्र आशिष यादव, कारचाकल आणि अन्य एक व्यक्ती होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर आशिष यादव याने ओशिवरा पोलीस स्थानक गाठत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सना गिल आणि शोबित ठाकूरसह आठ जणांविरुद्ध कलम 384, 143, 148, 427, 504 आणि 506 अन्वये गुन्हा दाखल केला.