जबरी चोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगार जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जबरी चोरीसह घरफोडीच्या गुन्ह्यातील अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनला यश आले आहे. त्याने भारती विद्यापीठ आणि मार्केटयार्ड परिसरात केलेले चार गुन्हे उघडकीस आले आहेत. सचिन गोपी बोकेफोडे (वय- 19, रा, सुंदरनगर, मांगडेवाडी कात्रज) असे अटक केलेल्या सराईताचे नाव आहे.

युनिट दोनच्या सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले पथकासह फरार तडीपार, आरोपीचा शोध घेत होते. त्यावेळी जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी कात्रज परिसरात असल्याची माहिती पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी आणि संजय जाधव यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून सचिन बोकेफोडे रा. कात्रज याला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने भारती विद्यापीठ व मार्केटयार्ड हद्दीत केलेल्या चार गुन्हयाची कबुली दिली आहे . तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्यांचेवर मालमत्ते विरुद्धचे अनेक गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त अमोल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, एपीआय वैशाली भोसले, एपीआय विशाल मोहिते, पोलीस अंमलदार मोहसीन शेख, संजय जाधव, उज्वल मोकाशी, शंकर नेवसे, निखिल जाधव, उत्तम तारू, गजानन सोनुने, गणेश थोरात, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे, कादिर शेख, समीर पटेल, नागनाथ राख यांनी केली आहे.