Pune crime news बांधकाम साईटवरून सहा लाखांचे साहित्य चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या साईटवरून चोरट्यांनी तब्बल सहा लाखांवर किंमतीचे साहित्य चोरून नेले. ही घटना 13 ते 20 जानेवारीला धानोरीतील खासगी बांधकाम व्यावसायिकाच्या साईटवर घडली आहे. संजय निकम (वय – 47 रा. रहाटणी, पिंपरी) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

धानोरीत डी. एन. पार्कमध्ये खासगी बांधकाम व्यावसायिकाकडून इमारतीचे बांधकाम सुरू आहे. 13 ते 20 जानेवारी दरम्यान चोरट्यांनी लोखंडी पाईप, वेगवेगळे साहित्य असा मिळून 6 लाख 35 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सातपुते तपास करीत आहेत.