मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृत कामगाराच्या पत्नीची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोशी कचरा डेपो येथील कचऱ्याचा डोंगर ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेला मृत्युमुखी पडलेल्या एका कामगाराची पत्नी सोनाली नागेश गायकवाड (23) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, सोनाली यांच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी माहेरच्या नातेवाईकांनी केली आहे.

नागेश यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱया आर्थिक मदतीच्या रकमेसंदर्भातील वादातून सोनाली यांना त्रास देण्यात आला आणि त्यातूनच त्यांचा जीव गेल्याचा गंभीर आरोप त्यांच्या आई मीरा वकटे आणि वडील लोभाजी वकटे यांनी केला आहे. नागेश  यांच्या कुटुंबीयांना पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून 10 लाखांची मदत नुकतीच मिळाली होती. त्यानंतर त्यांना कंपनीकडून 40 लाख तर राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत मिळणार होती.