Pune – सासवडमध्ये गोदामाला आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fire-engine

पुण्यातील सासवड बोपदेव रोडवरील एका गोदामाला पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली.

यासंदर्भात एएनआय वृत्तसंस्थेने ट्विट केले आहे. ‘घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या 8गाड्यांनी आग आटोक्यात आणली. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे पुणे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.