नगर जिल्ह्यात रेल्वे पोलीस कर्मचार्‍याची आत्महत्या

463
प्रातिनिधिक

नगर जिल्ह्यातील बेलापूर रेल्वे स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक मिनीचंद मिना यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महात्या केली. मीना हे राजस्थान मधील अलवर या गावात रहिवासी होते.

मिना सध्या ते  रेल्वे स्टेशन समोरील महात्मा फुले हौसिंग सोसायटी मध्ये भाड्याच्या बंगल्यात दोन वर्षापासून एकटेच राहत होते. त्यांची पत्नी व 15 वर्षाची मुलगी गावी राहतात.  काल रात्री 1 वाजेपर्यत मीना हे  मित्रासोबत गप्पा मारत होते. सकाळी आठ वाजता मिना यांना उठविण्यासाठी कर्मचारी गेले होते. दरवाजा उघडला  नसल्याने ते परत गेले. ऑफिसला का आले नाही म्हणून पुन्हा दोन कर्मचारी घरी गेले. दरवाजा वाजविला. पण दरवाजा उघडला नाही म्हणून मागील बाजूच्या खिडकीतून पाहिले असता, मिना हे गळफास घेतलेल्या आवस्थेत दिसले. तातडीने पोलिसांना कळविले. पोलिसांनी दरवाजा तोडला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. त्यांचे पार्थिव अलवर येथे पाठविण्यात आले.  मीना हे चांगले अधिकारी होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळालेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या