राजस्थान – गेहलोत सरकारमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद मिटला असून आता राजस्थानमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नवे मंत्री रविवारी दुपारी 4 वाजता शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

नव्या मंत्रिमंडळात सचिन पायलट यांच्या गोटातून अनेकांची नावे पुढे येत आहेत. यात हेमाराम चौधरी, बृजेंद्र ओला, दीपेंद्र सिंह शेखावत, रमेश मिणा आणि मुरारीलाल मिणा यांची नावे आघाडीवर आहेत. दुसरीकडे गेहलोत यांच्या गोटातील बसपाचे राजेंद्र गुढा, अपक्ष महादेव खंडेला, संयम लोढा, काँग्रेसचे आमदार महेंद्रजीतसिंग मालवीय, रामलाल जाट, मंजू मेघवाल, जाहिदा खान आणि शपुंतला रावत यांची नावे आघाडीवर आहेत.