
आंबव येथील प्र.शि.प्र. संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार आणि त्यांचे इतर मित्र अशा सात जणांनी मिळून एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्यांनी 8 बाय 4 फुटाचा व्हाइट बोर्डवर अत्यंत कमी वेळेत जास्तीतजास्त लोकांच्या सह्या घेण्याचा संकल्प सिद्धीस नेला आणि याची दखल घेत या सातही विद्यार्थ्यांना एशिया बुकतर्फे पदक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे.
महाविद्यालयाच्या मेकनिकल विभागामध्ये अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱया श्रेयस डोंगरे, आदित्य जाधव, सुयोग अणेराव आणि कपिल मुळे यांनी यामध्ये सर्वोत्पृष्ट योगदान दिले आहे. मुख्यतŠ लेक्चरनंतर मधल्या वेळेत नोटबुकवर विविध प्रकारच्या सह्या तयार करणे किवा कार्टून बनविणे हा जवळपास अनेक विद्यार्थ्यांचा छंद असतो. हा छंद जोपासताना यातून एक विक्रम प्रस्थापित होऊ शकेल, अशी कल्पना या विद्यार्थ्यांच्या डोक्यात सर्वांनी मिळून यावर विचार करून आरखडा बनविला.
याच दरम्यान कोल्हापूर येथील संजय घोडावत युनिवर्सिटीमध्ये ‘व्हायब्रंट’ या टेक्निकल स्पर्धा कार्यक्रमात या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यावेळी महाविद्यालयाचे हे चार विद्यार्थी व संजय घोडावत युनिवर्सिटीमधील त्यांचे तीन मित्र अशा सात जणानी मिळून ही कल्पना या ठिकाणी तडीस नेण्याचा विचार केला.
3139 सह्यांचा विक्रम
सह्यांच्या या कार्यक्रमावेळी त्यांनी 8 बाय 4 फुटाचा व्हाइट बोर्ड घेऊन त्यावर 6320 चौकोन तयार केले. त्यावर कार्यक्रमस्थळी येणाऱया प्रत्येकाची नोंदणी व मार्पिंग करून त्यावर सह्या घेतल्या. 14 तास आणि 22 मिनिटांमध्ये अशा प्रकारे तब्बल 3139 सह्या गोळा करण्यात त्यांनी यश मिळविले आणि हा अनोखा विक्रम घडविला.
































































