
रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी येथील धनावडेवाडी बंधाऱ्यात पोहण्यासाठी 16 वर्षीय मुलाचा बूडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. सार्थक सुहास गुरव (16) असे मयत मुलाचे नाव आहे. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे गयाळवाडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
सार्थक हा आपल्या मित्रांसोबत कारवांचीवाडी येथील धनावडेवाडी बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेला होता. मित्रांसोबत पोहण्याचा आनंद घेत असताना सार्थकला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्या मित्रांनी आरडा-ओरडा केल्यामुळे परिसरातील नागरीक बंधाऱ्याजवळ धावत आले. त्यांनी सार्थला पाण्यातून बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. परंतु सार्थकच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घोषित केले.


























































