
विनोद बोधनकर
मागील 20 वर्षांत मानवजातीला कळत गेले की, प्लॅस्टिकची चिवट शक्ती आणि टिकाऊ ताकत पुढे घातक बनत आहे ती मानवासाठी, प्राण्यांसाठी आणि वनस्पतींसाठी. आपली एक सवय यास कारणीभूत आहे. आपण प्लॅस्टिक वापरल्यावर निष्काळजीपणे फेकून देतो. दरवर्षी 197 देशांतून 14,000,000 टन टाकाऊ प्लॅस्टिक हे विहिरी, भू– गर्भ– जल, तलाव, नदी, नाले आणि समुद्रात जात आहे. जलचरांच्या जीवन शुद्धी, कर्म, प्रजनन, उक्रांतीच्या मार्गात प्लॅस्टिक कचरा फेकणारे व त्यांनी फेकलेला 100 वर्षे राहणारा प्लॅस्टिक कचरा एक जैविक तांत्रिक अडथळा म्हणून उभा आहे.
आपल्या कळत-नकळत झालेले प्रदूषण आज सागरापर्यंत पोहोचले आहे. आपण प्रत्येक जण त्याला जबाबदार आहोत. एकच उदाहरण घ्या ना, औद्योगिक क्रांतीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका असलेले जीवाष्म-इंधन-पेट्रो-केमिकल्स-फॉसिल-फ्युएल्स हे प्रचंड प्रमाणात जमिनीतून काढले गेले. त्या कृत्रिम ऑईल म्हणजेच खनिज तेलातून आपण एडिशन फ्युएल्स काढून घेतो. मग पेट्रोल, डिझेल अशी इंधने. शेवटी जो लगदा उरतो तो पूर्वी वाया जात असे. मग त्या उरलेल्या लगद्यातून हायड्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन हे काढून त्याचे वेगवेगळे प्रकारचे प्लॅस्टिक बनवले. हे प्लॅस्टिक आपल्यासाठी वरदान म्हणून आले. मग काय झाले आणि प्लॅस्टिक एक शाप आहे, असे लोक म्हणू लागले?
प्लॅस्टिकमध्ये सर्वोत्तम तत्त्व कोणते, तर पारदर्शक, टिकाऊ आणि वॉटरप्रूफ! आपले खाद्य पाण्यापासून आणि धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आवरण! लाखो प्लॅस्टिकच्या खुर्च्या वापरल्या तर लोकांच्या खुर्च्या बनविण्याची गरज ती काय? अशा प्रकारे प्लॅस्टिकचे वरवर, म्हणजे प्रथमदर्शनी दिसणारे फायदे खूप असल्यामुळे मानव प्लॅस्टिक बनवतो, विकतो आणि वापरतो. त्यातील सूक्ष्म विषारी कण प्लॅस्टिक अन्नामध्ये हळूहळू मिसळत असतात, हे कळायला वेळ लागला. आणि सवय इतकी झाली की, आता प्लॅस्टिक वापर बंद करा म्हटले तरी कळते, पण वळत नाही. मागील 20 वर्षांत मानवजातीला कळत गेले की, प्लॅस्टिकची चिवट शक्ती आणि टिकाऊ ताकत पुढे घातक बनत आहे ती मानवासाठी, प्राण्यांसाठी आणि वनस्पतींसाठी. आपली एक सवय यास कारणीभूत आहे. आपण प्लॅस्टिक वापरल्यावर निष्काळजीपणे फेकून देतो.
दरवर्षी सर्व 197 देश मिळून – 30 लाख टन टाकाऊ प्लॅस्टिक नदीमार्गे समुद्रात टाकतात, 50 लाख टन समुद्रकाठातील गावांतून टाकतात. 60 लाख टन दरवर्षी तलाव, नाले आणि नदीच्या पात्रात, काठावरील झाडांमध्ये आणि झुडपांमध्ये अडकून राहते, शहरातील गटर आणि गलिच्छ नाल्यांमध्ये अडकून राहते. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट समजली पाहिजे ती अशी – उन्हाच्या अतिनील किरणांमुळे प्लॅस्टिकचे तुकडे होतात. बिसलेरी बाटलीचा पारदर्शक भाग 300 वर्षांनंतर सूक्ष्म- कणांपर्यंत (हहद- ज्artग्म्ते) तुटत जातो, विखरत जातो. हे नॅनो- पार्टिकल्स प्लॅस्टिकच राहतात, त्यांची माती होत नाही. बिसलेरी बाटलीचे टोपण 800 वर्षांनंतर बारीक चुरा होत होत नॅनो पार्टिकल्स बनते.
आपल्या समुद्रात पसरल्यामुळे आता हे प्लॅस्टिक कण – पक्षी, मासे आणि इतर जिवांना मारतात. हे छोटे जीव प्लॅस्टिक पाहतात, खातात आणि लाखोंच्या संख्येने मरतात. या जलचरांच्या जीवन शुद्धी, जीवन कर्म, जीवन प्रजनन आणि जीवन उक्रांतीच्या मार्गात सर्व प्लॅस्टिक कचरा फेकणारे आणि त्यांनी फेकलेला 800 वर्षे राहणारा प्लॅस्टिक कचरा – एक जैविक- तांत्रिक अडथळा म्हणून उभा आहे.
सागरमित्र अभियान अंतर्गत – पाचवी ते दहावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांना नेतृत्वगुण विकसित होतील, असे सहज सोपे काम दिले गेले आपले राजकुमार-राजकुमारी आपल्या घरातील प्लॅस्टिकचा कोरडा कचरा एका प्लॅस्टिकच्याच पिशवीत भरून तो शाळेत आणत गेले. प्लॅस्टिकचे रिसायकलिंग करणारे उद्योजक आले आणि त्यांनी त्यांची जबाबदारी यथाशक्ती निभावली व त्यात सुधार आणत आहेत.
सागरमित्र अभियान ः 2011 मध्ये 150 विद्यार्थी. 2012 मध्ये 10,000; मग 21,000, 41,000 आणि 2015 मध्ये 61,000 विद्यार्थी यांनी घरचे प्लॅस्टिक शाळेत आणून दिले. हा त्या प्रत्येकाचा मुंगीचा वाटा. 2015 मध्ये ध्ण्Aिंऱ प्Rिंध् हा आंतरराष्ट्रीय किताब मिळताच सर्व विद्यार्थी खरेच सागरमित्र बनून कृतार्थ झाले.
2020 मध्ये कोरोना महामारी (पँडेमिक) असूनही 100 टन टाकाऊ प्लॅस्टिक जमा झाले. 2021 मध्ये पण 100 टन. पँडेमिकच्या अवघड वर्षांत शाळा बंद असूनही घर-संकुलाच्या माध्यमातून आई-वडील आणि मुले, सर्व कुटुंब मिळून, कोरडय़ा प्लॅस्टिक कचऱयाची पिशवी दर महिन्यात जमा करत होते. अशा प्रकारे हा सागरमित्र अभियान नावाचा अहिंसा प्रोजेक्ट आता व्यापक कार्य रचनाच्या प्रथम वळणावर आला होता. हेच कार्य नाशिकमध्येही करीत ब्रह्मगिरीच्या संपूर्ण परिसराची स्वच्छता राखण्यासाठी आणि गोदावरी माईचे पावित्र्य राखण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. 2022 ते 2026 मध्ये सागरमित्र अभियान ः नाशिकमधील नमामी गोदा संस्था आणि जलबिरादरी यांच्या भेटी होत गेल्या, सागरमित्र अभियान राबविले गेले. शिरपूर, धुळे, सांगलीमध्ये हे अभियान वेगाने स्वीकारले गेले. यासाठी जिल्हा परिषदेतर्फे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले, अभ्यासक्रम तयार करण्यात आला. सागरमित्रच्या विद्यार्थ्यांनी 2011 ते 2024 मध्ये रिसायकलसाठी एक हजार टन म्हणजेच चार लाख पोती भरून टाकाऊ प्लॅस्टिक आणले. 2024 मध्ये सागरमित्र अभियानला ‘अर्थ डे ग्रेट ग्लोबल क्लिनअप हिरो 2024’ हा जागतिक सन्मान मिळाला. सध्या सागरमित्रद्वारे जागरुकतेसाठी ऑनलाइन वर्ग घेतले जातात.
2025 मध्ये नाशिक कुंभ 2027 साठी मीटिंग्स झाल्या व विभागीय आयुक्त, जिल्हा आयुक्त व नाशिक महानगरपालिका यांनी सागरमित्र अभियानाला कुंभच्या प्लॅस्टिकविषयक जनसाक्षरतेसाठी Knowledge Partner ही म्हणून घेतले आहे. हरित कुंभ 2026 साठी विविध शाळांमध्ये शिक्षकांना व विद्यार्थ्यांना याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच 1258 गावांतील सरपंच आणि ग्रामसेवक यांचा सागर-ग्राम प्रशिक्षणाचा प्रस्ताव शासनाकडे दाखल आहे. आता सगळे लक्ष आहे 2030 पर्यंत महाराष्ट्रामध्ये सर्वच 85,00,000 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांपर्यंत निदान प्लॅस्टिक आणि सागरमित्र साक्षरतेपर्यंत आपल्यासाठी MSCERT, बालभारती व यशदातर्फे शालेय शिक्षण क्रमांत सागरमित्र हा विषय पर्यावरण-कार्यानुभव म्हणून आणण्यात येत आहे. आता हे अभियान ग्लोबल- वॉर्मिंगचा विषय केंद्राशी धरून सागरमित्र- पवनमित्र या रूपात उक्रांत होत आहे.





























































