
पेन्शन खात्यात पैसे जमा होऊनही ते न काढल्यास किंवा खात्याचा वापर न केल्यास, बँक खाते आणि पेन्शनवर काही नियम लागू होतात.
जर तुम्ही सलग 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ पेन्शनची रक्कम खात्यातून काढली नाही तर बँक किंवा सरकार ते खाते संशयास्पद मानू शकते.
पेन्शन पुन्हा सुरू करण्यासाठी किंवा सुरळीत ठेवण्यासाठी बँकेत जाऊन हयातीचा दाखला (Life Certificate) व केवायसी अपडेट करणे गरजेचे असते.
पुढील प्रक्रियेसाठी बँकेशी संपर्प साधावा लागतो. सेवानिवृत्ती धारकांनी कोणत्याही कागदी कारवाईला सामोरे जाण्यापेक्षा खात्यात व्यवहार करावा. .
त्यासाठी बँक खाते नेहमी सक्रीय ठेवा. KYC अपडेट करा. जर पेन्शन थांबविण्यात आली असेल तर लागलीच ईपीएफओ अथवा बँकेशी संपर्प साधा.























































