केरळमध्ये भूस्खलन, महिलेसह तिघे ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिह्यांमध्ये पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडत असून परिस्थिती गंभीर बनली आहे. इडुक्की जिह्यात शनिवारी झालेल्या भूस्खलनात एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. अनेक जिह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.