
रशियाने युक्रेनची राजधानी कीववर पुन्हा एकदा क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे मोठा हल्ला केला असून, या हल्ल्यात 9 नागरिकांचा मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर राजधानीतील अनेक निवासी आणि व्यावसायिक इमारतींचे नुकसान झाले असून विविध भागांत आग लागल्याने बचाव पथकांना तातडीने घटनास्थळी धाव घ्यावी लागली.
कीवच्या सोलोमियांस्की जिह्यात पाच मजली निवासी इमारतीवर अवशेष कोसळल्याने आग लागली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन लहान मुलांसह आठ जण जखमी झाले. डार्नित्स्की जिह्यात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे घरे, वाहने तसेच प्रशासकीय आणि इतर इमारतींचे मोठे नुकसान झाले. या भागात सात जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत.

























































