
उकड काढताना एका वाटी तांदळाच्या पिठासाठी एक वाटी पाणी घ्यावे. पाण्यात एक चमचा तूप आणि चिमूटभर मीठ आवर्जून टाकावे. थोडेसे दूध किंवा अर्धा चमचा साखर घातल्यास मोदक पांढरे शुभ्र आणि जास्त वेळ मऊ राहतात.
उकड गरम असतानाच हाताला तूप लावून ती चांगली मऊ मळून घ्यावी, जेणेकरून पारी करताना तिला तडे जाणार नाहीत. नारळ आणि गूळ एकत्र परतावे. सारण जास्त सुकवू नये, थोडे ओलसर ठेवावे म्हणजे मोदक खाताना छान लागतात.
























































