CWG 2026 – गुलवीर सिंगची अभूतपूर्व कामगिरी; 5000 आणि 10000 मीटर शर्यतीत पदक जिंकणारा पहिलाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा धावपटू गुलवीर सिंगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये इतिहास रचला आहे. पुरुषांच्या 5000 मीटर शर्यतीच्या अंतिम फेरीत कांस्यपदक पटकावून या प्रकारात राष्ट्रकुल पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ॲथलीट ठरला आहे. याआधी त्याने 10000 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. एकाच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 5000 मीटर आणि 10000 मीटर या दोन्ही प्रकारांत पदके जिंकणारा तसेच ॲथलेटिक्समध्ये एकाच प्रकारात दोन पदकांची कमाई करणारा तो पहिला हिंदुस्थानी खेळाडू बनला आहे.

5000 मीटर शर्यतीचा अंतिम सामना अत्यंत अटीतटीचा झाला. गुलवीरने 13 मिनिटे 24.95 सेकंद वेळ नोंदवत केनियाच्या कॉर्नेलियस केमबोईला सेकंदाच्या अवघ्या चार शंभरांश फरकाने मागे टाकले आणि कांस्यपदकावर आपले नाव कोरले. या शर्यतीत केनियाच्या मॅथ्यू किपसांगने 13 मिनिटे 23.61 सेकंद वेळेसह सुवर्णपदक, तर ऑस्ट्रेलियाच्या काय रॉबिन्सनने 13 मिनिटे 24.70 सेकंद वेळेसह रौप्यपदक मिळवले.

राष्ट्रकुल स्पर्धा 2026 मधील या यशापूर्वीच गुलवीरच्या कामगिरीची क्रीडा जगतात मोठी चर्चा होती. 2023 मध्ये आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 5000 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप सोडली होती. त्याच वर्षी झालेल्या आशियाई खेळांमध्ये 10000 मीटर शर्यतीतही त्याने कांस्यपदक पटकावले होते.

CWG 2026 – हिंदुस्थानच्या बॉक्सर्सची सुवर्णलूट! एकाच दिवशी आठ गोल्ड मेडल मिळवत रचला इतिहास

दक्षिण आफ्रिकेतील गुमी येथे पार पडलेल्या 2025 च्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये गुलवीरने 5000 आणि 10000 मीटर या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकून दुहेरी मुकुट परिधान केला होता. त्याच वर्षी त्याने एक मैल शर्यत 4 मिनिटांच्या आत अर्थात 3 मिनिटे 55.63 सेकंदात पूर्ण करणारा पहिला हिंदुस्थानी खेळाडू होण्याचा पराक्रम केला. याशिवाय 59 मिनिटे 42 सेकंद वेळेत हाफ-मॅरेथॉन पूर्ण करून एका तासाच्या आत हाफ-मॅरेथॉन पूर्ण करणारा तो देशातील पहिलाच धावपटू बनला होता.

भरवशाच्या नीरज आणि लव्हलिनाकडून अपेक्षाभंग; राष्ट्रकुल स्पर्धेत हिंदुस्थानची भालाफेकीत ऐतिहासिक कामगिरी