मोदी, इतरांनाही आया असतात हे विसरू नका! राज ठाकरे आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जंतरमंतरवरील आंदोलनात पंतप्रधानांबद्दल जी भाषा वापरलेली होती ती अयोग्यच होती, पण याची सुरुवात भाजपच्याच ट्रोल आर्मीने केली. नरेंद्र मोदींना माझे सांगणे आहे की, इतरांनाही आया असतात हे विसरू नका. तुमच्या पक्षातील लोकांनाही मर्यादा पाळायला सांगा, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा वर्धापन दिन सोहळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना राज ठाकरे पंतप्रधान मोदी यांनी शुक्रवारी रात्री इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओचा संदर्भ देत भाजपच्या ट्रोलिंग संस्कृतीवर हल्ला चढवला. पंतप्रधानांनी सांगितलं की मला शिव्या दिल्या, माझ्या आईबद्दल बोलले हे चुकीचंच आहे. कुणाच्याही बाबतीत अशी भाषा वापरली जाऊ नये हे मला शंभर टक्के मान्य आहे. हे तुम्ही पक्षातील तुमच्या पक्षातल्या लोकांनादेखील हे सांगितलं पाहिजे, असे राज ठाकरे म्हणाले.

महात्मा गांधींपासून, जवाहरलाल नेहरूंपासून, इंदिरा गांधींपासून आतापर्यंत सगळय़ांपर्यंत, आमच्यापर्यंत. ज्या प्रकारची तुमची ट्रोलची जी काही टीम प्रत्येक राज्या-राज्यामध्ये जी बसवलेली आहेत, लोपं बसवलेली आहेत, ते कोणत्या भाषेमध्ये आणि कोणत्या गोष्टी करत असतात? अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली.

लाठी हल्ल्याचे आदेश देणारे माफी कधी मागणार?

आज पंतप्रधान सांगतायत की मी त्या मुलांना सगळ्यांना माफ केलं. पण इतकी वर्षं, 12 वर्षं तुमच्या लोकांनी जे काही केलंय, त्याची माफी कोण मागणार? हे विद्यार्थी तरुण तिकडे जंतरमंतरला बसले होते, ज्यांची डोकी पह्डली, लाठय़ा-काठय़ा मारल्या, त्याचे आदेश देणारे जे लोपं होते, ते कधी माफी मागणार? असा सवाल करत राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला.

सिद्धिविनायकाच्या दानपेटीतील 18 कोटींची चोरी

प्रभादेवीच्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतून दरवर्षी सुमारे 18 कोटींची चोरी होते. ही चोरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पकडण्यातही आले आहे. या प्रकरणाची पाळेमुळे आणखीन वरपर्यंत पोहोचली असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला. हा प्रकार मंदिरातील विश्वस्तांनी समोर आणला आहे. या प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वस्तांनी लिहिलेले पत्रच राज ठाकरे यांनी वाचून दाखविले.