
>> डॉ. समिरा गुजर-जोशी
किं नाम दर्दुर दुरध्यवसाय सायं कायं निपीडय़ निनदं कुरुषे रुषेव ।
एतानि केलिरसितानि सितच्छदानामाकर्ण्य कर्णमधुराणि न लज्जितोसि ।।
हे बेडका! संध्याकाळच्या वेळी शरीर आकसून, जणू काही रागानेच, असा मोठमोठय़ाने आवाज का काढतोस? (डराव डराव का करतोस) शुभ्र पंख असलेल्या हंसांचे कानाला अतिशय मधुर वाटणारे क्रीडाविलासाचे स्वर ऐकूनही तुला स्वतच्या कर्कश आवाजाची लाज वाटत नाही का?
येथे बेडूक म्हणजे अल्पगुणी, पण मोठमोठय़ाने बोलणारा मनुष्य, तर हंस म्हणजे विद्वान, सुसंस्कृत आणि गुणवंत व्यक्ती. श्रेष्ठ व्यक्तींच्या सान्निध्यात राहूनही काही लोक स्वतचे दोष ओळखत नाहीत, उलट अहंकारानेच वागतात. अशा अविवेकी लोकांवर हा श्लोक उपरोधिक टीका करतो.




























































