इंडोनेशियात जहाजाला आग; दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू, 41 जण बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ रविवारी सकाळी जहाजाला आग लागली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला तर 41 जण बेपत्ता आहेत. सापुडी बेटाच्या उत्तरेस सुमारे 19 नॉटिकल मैल अंतरावर ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे आणि आगीचे नेमके कारण अद्याप तपासले जात आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘केएमपी मुतियारा सेंटोसा 2’ (KMP Mutiara Sentosa 2) हे जहाज सुराबाया येथील तंजुंग पेराक बंदरावरून सुलावेसी बेटावरील मकासारकडे चालली होती. प्रवासाच्या काही तासांनंतर फेरीला आग लागल्याची सूचना कॅप्टनने दिली. त्यानंतर काही वेळातच या जहाजाशी असलेला संपर्क तुटल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आजूबाजूची अनेक जहाजे बचाव कार्यात सहभागी झाली. आग लागल्यानंतर जहाजातून उड्या मारलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी टीबी हसनूर 26 (TB Hasnur 26) आणि ब्रिटिश मेंटॉर (British Mentor) ही जहाजे मदत करत आहेत, असे सुराबाया शोध आणि बचाव कार्यालयाचे प्रमुख नानंग सिगिट यांनी सांगितले.