पुन्हा रात्रीस खेळ चाले…!

सामना प्रतिनिधी । मुंबई  

कोकणाच्या पार्श्वभूमीवर चित्रीत झालेली, एकामागोमाग एक घडत जाणार्‍या रहस्यमय घटनांचा माग घेताना कोकणातील सगळ्या प्रथा, रूढी, अंधश्रद्धा यांचा आधार घेत रचलेली ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर 14 जानेवारीपासून रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नाईकांच्या वाड्यातील घडणार्‍या घटनांचे रहस्य कसं उलगडणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. रात्रीस खेळ चालेमधील ‘ता इसरलंय..’ हा संवाद आणि तो संवाद बोलणारा पांडू अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या संवादामुळे घराघरांमध्ये पोहोचलेला लेखक अभिनेता प्रल्हाद कुरतडकर हा ‘रात्रीस खेळ चाले’च्या दुसर्‍या भागाचेदेखील लेखन करत आहेत.