दखल : यशाची गुरुकिल्ली

>> डॉ. अनिल कुलकर्णी

डेल कार्नेगी यांचे ‘हाऊ टू एन्जॉय युवर लाईफ अॅण्ड युवर जॉब’ हे प्रा. आराधना कुलकर्णी यांनी अनुवादित केलेले पुस्तक साकेत प्रकाशनतर्फे नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

डेल कार्नेगी हे सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय अमेरिकन लेखक व व्याख्याते होते. त्यांनी आत्मविकास, विक्री काwशल्य, कॉर्पोरेट प्रशिक्षण, वत्तृत्व कला आणि संभाषण कला हे प्रशिक्षण अभ्यासक्रम विकसित केले आहेत. तुमच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील परिपूर्णतेचा आनंद मिळवण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. आपल्या व्यवसायात कार्यसंतुष्ट कसे राहावे, स्वतःची बलस्थाने कशी वृद्धिंगत करावीत, पंटाळा व नैराश्यावर मात कशी करावी, व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाचा समतोल कसा साधावा, या दृष्टिकोनातून हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शन करते. हे पुस्तक तुमच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाच्या यशस्वीतेची गुरुकिल्ली आहे. प्रा. आराधना कुलकर्णी यांनी अनुवाद इतका सहज आणि ओघवता केला आहे की, डेल कार्नेगी हेच आपल्याशी संवाद साधत आहेत असे वाटते.

जीवनातल्या असंख्य प्रश्नांवर छोटय़ा-छोटय़ा घटनांवर, अचानक समोर आलेल्या प्रश्नांवर, अस्तित्वातच असलेल्या गोष्टींनी वेगवेगळय़ा पद्धती वापरून आयुष्य कसे समृद्ध करता येते हे उदाहरणासहीत डेल कार्नेगी यांनी स्पष्ट केले आहे. डेल कार्नेगी यांनी निरीक्षणातून व अनुभवातून जीवनविषयक मांडलेले तत्त्वज्ञान सर्वांनाच आपलेसे वाटते. लोकांना तुम्ही आवडावे म्हणून काय करावे हे सांगताना निष्क्रियतेतून भीती व शंका निर्माण होतात. कृतिशीलता आत्मविश्वास व धैर्य वाढवते. जर तुम्हाला भीतीवर विजय मिळवायचा असेल तर घरात बसून राहू नका, बाहेर पडा आणि स्वतःला कशात तरी गुंतवून ठेवा.
व्यवहार कसा असावा हे सांगताना ते म्हणतात, हे लक्षात ठेवा की, तुमचा आनंद डेल कार्नेगी यांच्या विचारांतील सुलभता आणि स्पष्टताही गेली कित्येक वर्षे वाचकांच्या व्यक्तिगत आणि व्यवसाय जीवनात सातत्याने व प्रभावीपणे मार्गदर्शक ठरली आहे. यशस्वी व्यक्तिमत्त्वाच्या मानसशास्त्र्ााचे अचूक आकलन त्यांनी केले असल्याने वाचकांना आत्मविकास साधण्यासाठी जीवनात सम्यक निर्णय घेण्यासाठी यातून प्रभावी मार्गदर्शन मिळते. आपल्यातील उपजत क्षमतांचा पूर्णतः विकास करून त्यांचा उपयोग परिपूर्णतेने कसा करावा, याविषयी डेल कार्नेगी हे नेटकेपणाने सांगतात. मग ते विक्री काwशल्य असो वा संप्रेषण असो वा विपणन असो की सुखसमाधान असो, कार्नेगी हे वाचकांना आपल्या सर्वच क्षमतांचा वापर करून आपल्यातील सुप्त गुणांची प्राप्ती कशी करावी याविषयी सांगतात.

आयुष्यात यश मिळवायचे असेल तर काही माणसे, काही पुस्तके, काही प्रमाणात निरीक्षण हे निश्चित मदत करतात. कार्नेगी यांचे हे पुस्तक यश सुनिश्चित करण्यासाठी अवश्य वाचायलाच हवे.