अमिताभ गुप्ता यांची बदली, रितेश कुमार पुण्याचे नवे पोलीस आयुक्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संघटित गुन्हेगारी टोळ्यांचा बिमोड करण्यात ‘मोक्का’ कायद्याचा प्रभावी अंमलबजावणी करणारे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख (सीआयडी) अतिरिक्त पोलीस महासंचालक रितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली करण्यात आली. पिंपरीच्या पोलीस आयुक्तपदी विनयकुमार चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी रात्री गृहविभागाने दिले.

गृह विभागाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था याठिकाणी बदली करण्यात आली. दरम्यान, सीआयडीचे प्रमुख रितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर सीआयडीच्या प्रमुखपदी प्रशांत बुरडे यांची नियुक्ती करण्यात आली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील गुंड टोळ्यांना वचक बसविण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा प्रभावी वापर केला होता. गुप्ता यांच्या कार्यकाळात शहरातील 114 गुंड टोळ्यांच्या विरोधात कारवाई केली. तर झोपडपट्टी प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) गुंडांच्या विरोधात कारवाई करण्यात आली होती. गुप्ता यांच्या कार्यकाळात शहरातील 81 गुंडांच्या विरोधात एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करुन त्यांना वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध केले