रोबोयुद्धाचे सावट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद ताम्हनकर

‘रोबोटिक युद्ध तंत्रज्ञानाचा वापर’ यावर जगभरातील संरक्षण तज्ञांमध्ये चर्चा झडू लागली आहे. स्वयंनिर्णय घेता येऊ शकणारी ही शस्त्रs ‘ऑटोनॉमस’ म्हणून ओळखली जातात. काही तज्ञांच्या मते ‘ऑटोनॉमस’ तंत्रज्ञान हे कोणत्याही देशाच्या सुरक्षेसाठी आता काळाची गरज बनत चालले आहे. तुम्ही जरी अशा तंत्रज्ञानाला टाळायचे ठरवले, ‘ऑटोनॉमस’ शस्त्रs बनवली नाहीत, तरी इतर देश हे तंत्रज्ञान अवलंबणारच आहेत आणि शस्त्रs बनवणारच आहेत. मग अशा वेळी स्वसुरक्षेचा विचार जास्त महत्त्वाचा ठरतो.

‘रोबोटिक युद्ध तंत्रज्ञानाचा वापर’ यावर जगभरातील संरक्षण तज्ञांमध्ये चर्चा झडू लागली आहे. स्वयंनिर्णय घेता येऊ शकणारी ही शस्त्रs ‘ऑटोनॉमस’ म्हणून ओळखली जातात. या शस्त्रांच्या निर्मिती आणि वापराबद्दल अनेक तज्ञांच्यात मतमतांतरे आहेत. या तंत्रज्ञानाचा वापर करून युद्धात लढण्यासाठी रोबो सैनिकांची आणि शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्याचे प्रयत्न सध्या अनेक देशांकडून चालू आहेत.

संरक्षणावर कायमच प्रचंड खर्च करणारा चीन या ‘ऑटोनॉमस’ तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या नौसेनेतील अनेक जहाजांना व पाणबुडय़ांना स्वयंचलित बनविण्याच्या मागे लागलेला आहे, तर अमेरिका एअर फोर्स, एअरबेस आणि स्वयंचलित मिसाईलसाठी या तंत्रज्ञानावर काम करते आहे. इस्राईल तर जमिनीवरच्या शस्त्रांना अर्थात टँक, तोफा, मशीनगन यांच्या आधुनिकीकरणासाठी ‘ऑटोनॉमस’ तंत्रज्ञान राबवत आहे, तर ब्रिटनसारखा देशदेखील आपल्या नौसेना व हवाई दलाच्या प्रबळीकरणासाठी प्रयत्नशील आहे.

यातले काही देश ‘ऑटोनॉमस’ तंत्रज्ञानावर आधारित भूसुरुंग, समुद्री सुरुंग बनवण्याचे उद्योगदेखील करत आहेत. रक्त न वाहता आणि सैनिकांचे प्राण पणाला न लावता लढाया लढल्या गेल्यास त्या कोणाला नको असतील? पण या तंत्रज्ञानाचे दुष्परिणामदेखील तेवढेच घातक असणार आहेत, याकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? अनेक पश्चिमी देश या तंत्रज्ञानावर आधारित रोबोट अथवा शस्त्रांच्या अनेक चाचण्या केल्यानंतरच त्यांना आपल्या संरक्षण दलात सामील करून घेतात, मात्र रशियासारखा देश कायम इतरांवर कुरघोडय़ा करण्याच्या नादात अशा शस्त्रांना फारशा चाचण्या न घेताच तैनात करतो. अनेक संरक्षण तज्ञ या गोष्टीबद्दल सध्या प्रचंड चिंता व्यक्त करत आहेत.
काही तज्ञांच्या मते ‘ऑटोनॉमस’ तंत्रज्ञान हे कोणत्याही देशाच्या सुरक्षेसाठी आता काळाची गरज बनत चालले आहे. तुम्ही जरी अशा तंत्रज्ञानाला टाळायचे ठरवले, ‘ऑटोनॉमस’ शस्त्रs बनवली नाहीत, तरी इतर देश हे तंत्रज्ञान अवलंबणारच आहेत आणि शस्त्रs बनवणारच आहेत. मग अशा वेळी स्वसुरक्षेचा विचार जास्त महत्त्वाचा ठरतो.

मात्र सैनिक ज्याप्रमाणे स्वबुद्धीच वापर करून बंदूक हाताळतो त्याप्रमाणे बंदूक हाताळणे या तंत्रज्ञानाला शक्य नाही हा सगळ्यात मोठा धोका आहे. एखाद्या नागरी भागात जर युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली, अथवा दहशतवाद्यांशी चकमक झडली, तर मानवी सैनिक दहशतवादी आणि निरपराध नागरिक यांच्यातला फरक समजून गोळीबार करत असतो, मात्र ‘ऑटोनॉमस’ तंत्रज्ञान हे सामान्य नागरिक आणि दहशतवादी अथवा शत्रू यांच्यात फरक न करता सरळ गोळीबार करून मोकळे होईल. अशा वेळी जर काही निरपराध लोकांची हत्या झाल्यास त्याची जबाबदारी नक्की कोणाची असेल, याचादेखील अशा देशांनी विचार करायला हवा आहे असे तज्ञांना वाटते.

कोरोनाच्या संकटाशी संपूर्ण जग लढत असताना आपण बघतो आहोत. संपूर्ण जगाचे आर्थिक चक्र मंदावणाऱया या काळात सगळ्याच लहान- मोठय़ा देशांना आर्थिक आघाडीवर अनेक अडचणी येत आहेत. बेरोजगारी, कमी होत चाललेल्या व्यापार, वाढती महागाई अशा अनेक संकटांचा मुकाबला लहान-मोठे देश करत आहेत. अनेक देशांनी आपल्या खर्चात बचत करायला सुरुवात केली आहे. अशा वेळी महासत्ता म्हणविणारे किंवा महासत्तेकडे वाटचाल करत असलेले देश आपल्या संरक्षण खर्चात मोठी कपात करतील असा अंदाज लावण्यात येत होता, मात्र समोर येत असलेली ही माहिती पाहता हा अंदाज किती चुकीचा आहे त्याचाच प्रत्यय येतो आहे.

[email protected]