…तर अजिबात खपवून घेणार नाही, रोहित पवारांचा अजितदादांना इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जतमध्ये आयोजित शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धक्कादायक दावे केले. शरद पवारांनीच सत्तेत सहभागी होण्य़ासाठी भाजपसोबत जाण्याचे सांगितल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेवरही टीका केली. याला आता रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.

रोहित पवार यांनी एक ट्विट करत अजित पवार यांना उत्तर दिले आहे. रोहित पवारांनी ट्विटमध्ये म्हटले की, युवांच्या मागण्यांसाठी आम्ही सर्व युवा पुणे ते नागपूर असा 800 किमीचा पायी प्रवास करत असून नागरिकांशी संवाद साधत आम्ही आतापर्यंत 500 किमीचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. आपल्या नजरेत आमचा हा संघर्ष लहान असला तरी ज्या मागण्यांसाठी आम्ही संघर्ष करत आहोत त्या मागण्या अत्यंत महत्वाच्या असून लाखो युवांच्या भविष्याशी निगडित आहेत आणि याच मागण्यांसाठी भविष्यात मोठ्या संघर्षाची देखील आमची तयारी आहे.

तुमच्यात धमक होती तर काढा ना पक्ष, कोणी अडवलं होतं? ‘तो’ व्हिडीओ शेअर करत आव्हाडांचे अजितदादांना आव्हान

युवांच्या, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन चाललेल्या #युवा_संघर्ष_यात्रेकडे राजकीय टीकेसाठी का होईना आपले लक्ष गेलेच आहे तर युवकांचे जे मुद्दे आम्ही घेऊन चाललो आहोत त्यांच्याकडेही थोडे लक्ष द्या. आपण माझ्यावर काहीही टीका करा, टीका मी पचवून घेईल परंतु युवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर अजिबात खपवून घेणार नाही, असा इशाराही रोहित पवारांनी दिला.

शिवसेना-राष्ट्रवादीच्या पक्षप्रमुखांचे चारित्र्यहनन ही तर भाजपची स्क्रिप्ट; संजय राऊत यांचा घणाघाती आरोप

तुमची कार्यक्षमता आणि तळमळ महाराष्ट्राने याआधीही पाहिली आहे, भाजपसोबत गेलात म्हणून ती कार्यक्षमता आणि तळमळ कमी झाली असल्याच्या चर्चा असल्या तरी युवांचे प्रश्न मार्गी लावून आपली खरी ताकद पुन्हा एकदा दाखवून द्या, असे आव्हानही त्यांनी अजित पवारांना दिले.