दोन तीन मुलं तर असायलाच हवी, संघाच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

एकीकडे देशाची लोकसंख्या वाढत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सतीश कुमार यांनी चक्क किमान दोन तीन किंवा चार मुलं तरी जन्माला घातली पाहिजे असे वादग्रस्त आवाहन देशातील जनतेला केले आहे. जयपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना कुमार यांनी हे विधान केले.

”आपल्या देशात युवकांची कमी आहे. देशाचा जीडीपी घसरत चालला आहे. देशाला युवकांची गरज आहे. 2047 मध्ये जेव्हा देश विकसित बनेल तेव्हा आपल्याला देश युवकांच्या हाती द्यावा लागेल. त्यासाठी आपले कुटुंब मोठे असायला हवे. मी पाच सहा मुलं जन्माला घाला असं नाही सांगणार पण किमान दोन किंवा तीन मुलं नक्कीच पाहिजेत. चार मुलं असणं सुद्धा चांगली गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

”मी जे बोलतोय ते संशोधनाच्या आधारावर बोलत असून स्वदेशी संस्थेने चार मुलं असण्यावर अभ्यास केला आहे. 2०४७ मध्ये आपल्याला म्हाताऱ्यांचा देश व्हायचा नसेल तर जास्त मुलं जन्माला घालायला हवी’, असे सतीश कुमार यांनी सांगितले.