1971 मध्ये मोदी कोणत्या तुरुंगात होते, आरटीआयअंतर्गत माहिती मागवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौऱयावर असून सावर येथील शहीदांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पचक्र वाहिल्यानंतर केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता तसेच तुरुंगवासही भोगला होता असे म्हटले आहे. मोदींच्या या वक्तव्यावरून काँग्रेसने थेट आरटीआयच दाखल केला. 1971 मध्ये मोदी कोणत्या तुरुंगात होते या दाव्यासंदर्भात काँग्रेसने माहिती मागवली आहे.

कोरोना काळातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा असून ते दोन दिवस बांगलादेशमध्ये राहणार आहेत. शुक्रवारी ढाका येथे केलेल्या भाषणात स्वातंत्र्यलढय़ात माझा सहभात होता, तेव्हा माझे वय 20-22 वर्षांचे होते. स्वातंत्र्यासाठी येथील सत्याग्रहातही मी मित्रांसमवेत भाग घेतला होता असा दावा मोदींनी केला.

या भाषणावरून मोदींवर बरेच आरोप झाले. मोदींनी केलेल्या या दाव्याची शहानिशा करण्यासाठी काँग्रेसचे गुजरातमधील सोशल मीडिया कनव्हेअर सरल पटेल यांनी थेट आरटीआयच दाखल केला. यासंदर्भात पटेल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून माहिती दिली आहे.