ऐरोस्पेस मॉलमधील बारमध्ये रात्रभर धिंगाणा; आठ जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमाननगर परिसरातील ऐरोस्पेस मॉलमध्ये रात्रभर सुरू असलेल्या तरुणाईच्या धांगडधिंगाण्याला पोलिसांनी वेसण घातली आहे. द हाऊस कम्युनी बार अॅड इटरी बारवर गुन्हे शाखेने रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली असून, १ लाख ६७ हजारांचा मद्यसाठा आणि ७५ हजारांची साउंड प्रणाली जप्त करण्यात आली आहे.

 

सुमित रोहिदास गोटे (३०), नूर हुसेन शेख (३०), सोनाली विलास पंडित (३२), मंगेश उत्तम धिमधीमे, अनिकेत निवृत्ती मांडकीकीर (२१), सुनीता जैन वर्मा (२५), अनंत जगल गायकवाड (३१), शाहनूर अमीनुद्दीन काझी (३५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

 

बारमध्ये ८९ जण होते. त्यामध्ये ६३ पुरुष व २६ महिलांचा समावेश होता. या ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने दारूची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार याप्रकरणी ८ जणांना अटक केली आहे. तसेच दारूसाठा, डिजे सिस्टीम जप्त केली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त गौहर हसन, एसीपी शंकर खटके, पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनिरीक्षक पवार, जाधव, चौगुले, सरगर, चव्हाण, मंडलिक, नेवसे, तारु, तुपसुंदर, शिंदे, राठोड, खराडे, साबळे, केगले, रणपिसे, रेणुसे, राठोड, बांदल, शेलार यांनी केली.